पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020: दोघांच्या बदल्यात 'रॉयल' अजिंक्य दिल्लीचं 'कॅपिटल' 

अजिंक्य रहाणे

आयपीएलच्या गेल्या काही हंगामात राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरणारा मुंबईकर अजिंक्य रहाणे आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. फिरकीपटू मयांक मार्कंड्ये आणि राहुल तेवातिया यांच्या बदल्यात अजिंक्य दिल्लीच्या ताफ्यात सामिल झाला आहे. अर्थात हे दोन युवा राजस्थान रॉयल्सच्या संघातून खेळताना दिसतील. अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्सकडून २०११ ते २०१५ आणि २०१७ ते २०१९ या दरम्यान शंभरहून अधिक सामने खेळले आहेत.

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आमचे लक्ष: भाजप

बदली खेळाडूंच्या प्रक्रियेद्वारे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी झालेला अजिंक्य दुसरा भारतीय टॉप क्रिकेटर आहे. यापूर्वी आर. अश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबमधून दिल्ली कॅपिटल्समध्ये सामिल झाला होता. भारतीय संघातील हुकमी खेळाडूंनी दिल्लीचा संघ बहरलाय असंच चित्र आहे. सध्याच्या घडीला शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे देखील दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळतात. 

क्रिकेट अन् राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते

भारतीय संघाकडून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य झाल्याचा अभिमान असल्याचे संघाचे सह मालक पार्थ जिंदाल यांनी म्हटले आहे. शिखर धवन आणि ईशांत शर्मा यांच्या अनुभव आणि पंत, अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या जोरावर संघाने चांगली कामगिरी केली होती. अंजिक्यच्या येण्याने संघाच बळ आणखी वाढेल आणि यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स एक वेगळी उंची गाठेल, असा विश्वासही जिंदाल यांनी व्यक्त केला आहे.

 

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार: फडणवीस

अजिंक्य रहाणेनं आयपीएलच्या हंगामात १४० सामने खेळले असून यातील २४ सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. राजस्थान रॉयल्सशिवाय अजिंक्य मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट्स या संघातूनही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. १४० सामन्यातील १३२  डावात त्याने ३८२० धावा केल्या असून यात २७ अर्धशतके आणि २ शतकांचा समावेश आहे. १०५  ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका; लता मंगेशकरांच्या कुटुंबियांचे आवाहन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Capitals Complete Transfer Of Ajinkya Rahane Release Rahul Tewatia Mayank Markande To Rajasthan Royals