पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 : देशासाठी या अष्टपैलूने घेतली आयपीएलमधून माघार

क्रिस वोक्स

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामातून इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यातील आगामी हंगामासाठी तंदुरुस्त ठेवण्यासाठी क्रिस वोक्सने आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे, यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले होते. 

ICC WC:पत्नीचा खेळ पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला

दिल्ली कॅपिटल्सने वोक्सला १.५ कोटी एवढ्या मूळ किंमतीला खरेदी केले होते. वोक्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून पाहिले जात होते. त्याची जागा भरुन काढण्यासाठी कोणत्या अष्टपैलूला संघात घ्यावा, हा मोठा प्रश्न आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर असले.  

Video : 6-6-6-6-6..पण धोनीनं धुलाई नक्की केली कुणाची?

वोक्सने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत १८ सामने खेळले असून यात त्याने २५ विकेट्स आणि ६३ धावा केल्या आहेत. २०१८ च्या आयपीएल लिलावात त्याच्यासाठी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने ७.४ कोटी इतकी किंमत मोजली होती. या हंगामात त्याने ५ सामन्यात आठ बळी मिळवताना १०.३६ च्या सरासरीने धावाही खर्च केल्या होत्या. २०१९ च्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर यंदा दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते.   वोक्सशिवाय दिल्लीने  जेसन रॉय, शिमरोन हेटमायर, एलेक्स कॅरी, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे यांच्यासाठी पैसे मोजले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi capitals chris woakes pulls out of ipl 2020 to keep himself fit for upcoming english summer