पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-बांगलादेश सामन्यावर प्रदूषणाचे सावट

अरुण जेटली स्टेडियम

भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबरपासून टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना खेळवण्याचे नियोजित आहे. मात्र सध्याच्या घडीला सामन्यावर प्रदूषणाचे संकट घोंगावण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर दिल्लीमध्ये प्रदूषणामध्ये वाढ होत असते. याचा परिणाम सामन्या दरम्यान पाहायला मिळू शकतो.  

रजिथाच्या नावे लाजिरवाणा विक्रम, टी-२० त सर्वात महागडा गोलंदाज

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सामना दिवाळीनंतर आठवड्याभरात आहे. त्यावेळी दिल्लीचे वातावरण खेळाडूंसाठी त्रासदायक ठरु नये, अशी आम्ही आशा करत आहोत. बांगलादेशचा संघ दिल्लीमध्येच उतरणार आहे. त्यामुळे पहिला सामना दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. कोलकाताच्या मैदानातील कसोटी सामन्याने बांगलादेश आपाला दौऱ्याचा शेवट करेल. त्यानंतर संघाला थेट बांगलादेशला जाणे सहज सोपे आहे. बांगलादेश संघातील खेळाडूंचा सोयीस्कर अशा पद्धतीने सामन्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्याने दिली आहे.  

तमिमसाठी गुड न्यूज! पण, बांगलादेशचा संघ गोत्यात

उल्लेखनिय आहे की, २०१७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.