पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिपक पुनियालाही ऑलिम्पिक तिकीट, अखेरच्या ३० सेकंदात मारली बाजी

दिपक पुनिया

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांची धमाकेदार कामगिरी सुरु आहे. भारताच्या दिपक पुनियाने शनिवारी ८६ किलो वजनी गटात उपांत्यफेरी गाठत ऑलिम्पिक कोटा मिळवला.  

जागतिक कुस्ती स्पर्धाः बजरंग, रवीची कांस्य पदकावर मोहोर

दिपक पुनियाने ८६ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व सामन्यात   कोलंबियाच्या कार्लोस मेंडेज याला ७-६ असे पराभूत करत उपांत्यफेरीत धडक मारली. या लढतीत कोलंबियाच्या मल्लाने आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या ब्रेकमध्ये दिपक ०-३ फरकाने पिछाडीवर होता. अखेरच्या क्षणी त्याने बाजी मारत सामना आपल्या नावे केला. विशेष म्हणजे अखेरच्या ३० सेकंदात त्याने सामन्याला कलाटणी दिली. 

PKL : अनुप कुमार यांच्याकडून पंकजला मिळाला खास 'गुरुमंत्र'

उपांत्यफेरीत त्याची लढत स्वित्झर्लंडच्या स्टेफन रेजमुथ याच्याविरुद्ध होणार आहे. यापूर्वी महिला गटातून विनेश फोगट (५३ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो) आणि रवि कुमार (५७ किलो) वजनी गटात टोकियोमध्य रंगणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Deepak Punia wins Olympic Quota in mens 86 kg category after reaching semifinals at World Wrestling Championships