पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एका पुनियाने अव्वस्थान गाठले अन् दुसऱ्याने गमावले

दिपक पुनिया

जागतिक कुस्तीस्पर्धेत दमदार कामगिरी करणारा कुस्तीपटू दिपक पुनियाने आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. ८६ किलो वजनी गटात त्याने इराणच्या मल्लाला चार गुणांनी मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. 

... पण मी इंद्राणी मुखर्जींना कधी भेटलोच नाही - चिदंबरम

कझाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत दिपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते.
आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रमवारीत ८२ गुणासह त्याने हा पराक्रम केला.

पूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतला काढता पाय

याशिवाय जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटातील आपले अव्वलस्थान गमावले आहे. रशियाच्या गाद्जिमुराद राशिदोव याने बजरंग पुनियाला मागे टाकले. या दोन्ही मल्लांशिवाय महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं ६१ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर असून  ५७ किलो वजनी गटात रवि दाहियाने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepak Punia becomes world number one wrestler in 86 kg category Bajrang lost his top spot in 65 kg category