पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार

दीपा मलिक

शनिवारी क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ऍथलीट दीपा मलिक आणि आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणारा कुस्तीपटू बजरंग पुनियाला देशातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नने सन्मानित केले जाणार आहे. शनिवारी पुरस्कार समितीकडून याची घोषणा करण्यात आली आहे. 

दीपा मलिकने २०१६ मध्ये रिओ दी जानिरो पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुर्वण पदक पटकावले होते. त्याचबरोबर तिने आशियाई स्पर्धेतही रौप्य पदक पटाकवले हेते.

हार्दिक आणि क्रुणालने खरेदी केली महागडी 'लॅम्बॉर्गिनी'

निवृत्त न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील समितीने ६५ किलोग्रॅममधील जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले. सहा वेळा जागतिक विजेतेपद आणि ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती एमसी मेरी कोम निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाली नाही. तिचे वैयक्तिक प्रशिक्षक छोटेलाल यादव हे द्रोणाचार्य पुरस्काराच्या शर्यतीत होते.

तर बजरंग पुनियाने मागील वर्षी पुरस्कार न मिळाल्याने न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. बजरंगने मागील वर्षी जकार्ता आशियाई स्पर्धेत ६५ किग्रॅ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. 

अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांच्यासह १९ इतर खेळाडुंना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 

त्याचबरोबर बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार, टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि ऍथलिटक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंह ढिल्लों यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

पुरस्कार पुढीलप्रमाणे..

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 
बजरंग पुनिया - बॅटमिंटन 
दीपा मलिक - पॅरा अॅथलेटिक्स 

पाकिस्तानात 'ना स्वातंत्र्य, ना सुरक्षा': ग्रँट फ्लॉवर

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक) 
विमल कुमार - बॅटमिंटन 
मोहिंदर सिंघ धिल्लों - अॅथलेटिक्स 
संदीप गुप्ता - टेबल टेनिस 

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 
संजय भारद्वाज - क्रिकेट 
मर्जबन पटेल - हॉकी 
रामबीर सिंह खोखर - कबड्डी 


अर्जुन पुरस्कार (खेळाडू) 
ताजिंदरपाल सिंग टूर - अॅथलेटिक्स 
हरमित राजूल देसाई - टेबल टेनिस 
मोहम्मद अनास याहिया - अॅथेलेटिक्स 
एस. भास्करन - शरीरसौष्टव 
गुरप्रित सिंह संधू - फुटबॉल 
सोनिया लाटकर - बॉक्सिंग 
रवींद्र जडेजा - क्रिकेट 
पूनम यादव - क्रिकेट 
चिंगलेनसाना सिंह कंगुजम - हॉकी 
पूजा ढांडा - घोडेस्वार 
अजय ठाकूर - कबड्डी 
गौरव सिंग गिल - मोटर स्पोर्ट्स 
प्रमोद भगत - पॅरा स्पोर्ट्स (बॅटमिंटन) 
अंजुम मौदगिल - शूटिंग 

स्वप्ना बर्मन - अॅथलेटिक्स 
सुंदर सिंह गुर्जर - पॅरा स्पोर्ट्स (अॅथलेटिक्स) 
सिमरन सिंह शेरगिल- पोलो 
बी. साई प्रणित - बॅटमिंटन