पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे फक्त रोहितलाच जमेलं, धमाकेदार खेळीनंतर वॉर्नरने केली भविष्यवाणी

डेव्हिड वॉर्नर

अँडलेड कसोटीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्रिशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. या दमदार खेळीनंतर त्याने रोहित शर्मा हा ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढू शकतो, असे म्हटले आहे. त्याच्या पहिल्या त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाहुण्या पाकिस्तानला पराभूत केले आहे. या सामन्यात वॉर्नर ३३५ धावा करुन बाद झाला. तो ब्रायन लारा यांचा ४०० धावांचा विक्रम मागे टाकेल, असे वाटत होते. मात्र त्याला हे जमलं नाही.   

रोहित-रितिकाच्या 'त्या' फोटोमुळे हेजल युवीवर रागावली

आपल्या या दमदार खेळीनंतर 'फाक्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, मैदान खूप मोठे असल्यामुळे थकवा जाणवत होता. मोठे स्ट्रोक खेळण्यात अडचण येत होती. त्यामुळेच दुहेरी धाव घेण्यावर भर द्यावा लागला, असेही वॉर्नरने सांगितले. विडींजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांचा विक्रम मागे टाकण्याची क्षमता सध्याच्या घडीला रोहित शर्मामध्येच असल्याचे वाटते. तो लाराचा विक्रम सहज मागे टाकू शकेल, असा विश्वास वॉर्नरने व्यक्त केला.  

U19 World Cup 2020 : टीम इंडियाची घोषणा, प्रियमकडे नेतृत्वाची धूरा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची भिस्त असलेल्या रोहित शर्माला कसोटीमध्ये सुरुवातीच्या काळात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून सलामीवीर म्हणून मैदानात उतरल्यानंतर रोहितने कसोटीमध्येही डावाला सुरुवात करण्याची क्षमता दाखवून दिली होती. सलामीला आलेल्या रोहित शर्माने आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकावण्याच पराक्रम केला होता. त्याच्या दमदार खेळीमुळे मालिकावीर हा पुरस्कारही त्याने पटकावला होता.  कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लारा यांच्या नावे सर्वोच्च ४०० धावांचा विक्रम आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:David WarnerRohit SharmaAustralia PakistanYasir ShahDavid Warner Triple CenturyOpener Rohit SharmaCricket News