पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम धोक्यात, वॉर्नर करतोय पाठलाग!

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात त्याने स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला. यंदाच्या विश्वचषकात सर्वात जलद आणि सर्वप्रथम ५०० धावा करण्याचा विक्रम वॉर्नरने आपल्या नावे केला.

Video : स्मिथ-स्टॉयनिस चूक कोणाची?  

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरने १६६ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. स्पर्धेत वॉर्नरने आतापर्यंत  ४६ चौकार आणि ६ षटकार खेचले आहेत. वॉर्नरशिवाय यंदाच्या स्पर्धेत फिंच, बांगलादेशचा शाकिब अल हसन, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, न्यूझीलँड कर्णधार केने विलियमसन आणि जो रुट यांच्या नावे प्रत्येकी दोन शतके आहेत.    

#ENGvAUS क्रिकेटच्या पंढरीत अनोखं दर्शन!

उल्लेखनिय आहे की, वॉर्नरचा धमाका असाच कायम राहिला तर तो यंदाच्या विश्वचषकात विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. २००३ च्या विश्वचषकात सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. वॉर्नर या विक्रमापासून १७३ धावा दूर आहे. इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने उपांत्यफेरीतील प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे वॉर्नरकडे आता आणखी तीन सामने आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:david warner 500 runs icc cricket world cup 2019 sachin tendulkar world cup record most runs