पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या लष्करी प्रशिक्षणाची इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूकडून खिल्ली

महेंद्रसिंह धोनी

विश्वचषकानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे. विश्वचषक संपताच धोनीच्या निवृत्तीचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. परंतु, बीसीसीआयने धोनी इतक्यात निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विंडीज दौऱ्यातून धोनीने स्वतः माघार घेतली आहे. धोनी या काळात भारतीय लष्कराचे दोन महिन्याचे प्रशिक्षण घेणार आहे. धोनीची निवृत्ती, लष्करी प्रशिक्षण आणि विंडी़ज दौऱ्यावर न जाण्याच्या निर्णय हा फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही चर्चेचा विषय झाला आहे. धोनीच्या लष्करी प्रशिक्षणावरुन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डेव्हिड लॉयड याने टि्वट करुन स्वतःचे हसे करुन घेतले आहे. धोनीवर टि्वट केल्यानंतर लॉयड चांगलाच ट्रोल झाला आहे. 

महेंद्रसिंह धोनीने यापूर्वीच पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्याने विंडीज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. त्याच्या ऐवजी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ऋषभ पंतला जागा देण्यात आली आहे. 

दरम्यान, स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने धोनीच्या लष्कर प्रशिक्षण आणि विंडीज दौऱ्यावरुन माघार घेण्याचे वृत्त टि्वट केले. डेव्हिड लॉयडने तेच टि्वट रिटि्वट करत स्माईली इमोजीचा वापर केला. धोनीच्या चाहत्यांना हे आवडले नाही. त्यांनी लॉयडला ट्रोल केले. त्याच्या करिअरचेच वाभाडे काढले. 

धोनीवर अशी कमेंट करणे म्हणजे लष्कराचा अपमान करण्यासारखे असल्याचे चाहत्यांनी म्हटले. टि्वटरवर लॉयडवर प्रचंड राग व्यक्त करण्यात येत आहे.