पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs WI: बुमराहच्या बाउन्सरवर डॅरेन ब्रावो 'रिटायरहर्ट'

बुमराहच्या उसळत्या चेंडूने घेतला ब्रावोच्या हेल्मेटचा वेध

जमैकाच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहच्या एका उसळत्या चेंडूने विंडीज फलंदाज डॅरेन ब्रावोच्या हेल्मेटचा वेध घेतला. चेंडू लागल्यानंतर चक्कर आल्याने ब्रावो 'रिटायरहर्ट' होऊन तंबूत परतला. त्याच्या जागी राखीव खेळाडू जेरमायन ब्लॅकवूड फलंदाजीला आला. ब्रावोने ५१ चेंडूत २३ धावा केल्या. अ‍ॅशेस मालिकेदरम्यान जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला लागल्याचे पाहायला मिळाले होते. बुमराहचा चेंडूने त्याक्षणाची आठवण ताजी केली.  

पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोप प्रकरणात शमी विरोधात अटक वॉरंट

जसप्रीत बुमरहचा उसळता चेंडू (बाउन्सर) डॅरेन ब्रावोच्या हेल्मेटच्या नेक गार्डवर जाऊन आदळला. त्यामुळे नेकगार्ड पूर्णपणे तुटल्याचे पाहायला मिळाले.   ब्रावोचा चेंडू लागलण्यानंतर विंडीज फिजिओ मैदानात आले. ब्रावोने चक्कर येत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडीजसमोर ४६८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे.

 

IND vs WI: बुमराहचा भेदक मारा, हॅटट्रिकसह टिपले ६ बळी

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या आघाडी फलंदाजांनी नांगी टाकली होती. पहिल्या डावात बुमराहने अवघ्या २७ धावा खर्च करत विंडीजच्या सहा गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. यात त्याच्या हॅटट्रिकचाही समावेश आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Darren Bravo hit by Jasprit Bumrah bouncer not came to bat again due to concussion Jermaine Blackwood named substitute for him