पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रतिस्पर्धी ताफ्याला निकामी करण्यासाठी आफ्रिकेची 'स्टेनगन' सज्ज

डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झालाय. इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत संघात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे स्टेनने म्हटले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतून दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो आता आगामी टी-२० विश्वचषकात खेळण्याचे संकेत मिळत आहेत. 

Cricket Record Book : पदार्पणात षटकाराने खाते उघडणारे चार धाकड गडी!

सध्याच्या घडीला स्टेन बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसत आहे.  cricket.com.au ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत मी दक्षिण आफ्रिकेच्या संघात असेन. यासंदर्भात संघ व्यवस्थापनाशी चर्चा झाल्याची माहितीही त्याने दिली. ऑस्ट्रेलियात होणारी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे त्याने सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये अधिक काळ गोलंदाजी करावी लागते त्या तुलनेत टी-२० मध्ये केवळ चार षटकांचा कोटा पूर्ण करावा लागतो. त्यामुळे या प्रकारात खेळताना फारशी अडचण येणार नाही, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

Ranji Trophy : शुभ'मन'चं अशुभ वर्तन, बाद दिल्यानंतर अंपायरला शिवीगाळ

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापूर्वी २०१९ च्या आयपीएल स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरुन तो विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात दाखल झाला. मात्र मोजके सामने खेळून त्याला बाहेर पडावे लागले होते. त्याला लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणाचा परिणाम  २०२० साठी झालेल्या आयपीएलमध्येही पाहायला मिळाला. आगामी आयपीएलसाठी कोणीही त्याला संघात घेण्याचे धाडस दाखवले नाही. अखेर रॉयल चॅलेंजर्सने २ कोटी या बेस प्राइजवर त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल्याचे पाहायला मिळाले होते. आगामी टी-२० विश्वचषकाचे ध्येय ठेवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणारा स्टेन आयपीएलसंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.