मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मिस्टर रिलायबल राहुल द्रविडच्या खेळाने प्रभावित असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून डेलने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने सचिनला वॉलची उपमा दिली आहे. खरतंर क्रिकेटच्या मैदानातील संयमी खेळीनं राहुल द्रविडला वॉल म्हणून ओळखले जाते. पण डेलने आपल्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पाँटिंगला प्राइम तर सचिनला वॉल संबोधले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणे 'मुश्किल': अख्तर
पाँटिंग, तेंडुलकर शिवाय त्याने द्रविड, गेल आणि केपी (केविन पीटरसन) हे देखील सर्वोत्तम फलंदाज असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केलाय. काही नेटकरी त्याच्या या ट्विटमधील चूक दाखवून देत वॉल सचिनला नव्हे तर द्रविडला म्हणतात, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोरोना विषाणूमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. 'घरीच बसा अन् कोरोनाला हरवा' हा मंत्र सध्या जपला जात असून घरात बसून असलेले खेळाडू घरात लॉकडाऊन झालेल्या आपल्या चाहत्या वर्गाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असताना डेलला सर्वोत्तम फलंदाजांसोबतच कोणाची गोलंदाजी अधिक प्रभावीत करणारी आहे? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर डेलने ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सचं नाव सांगितले.
कोरोनाशी लढा : राज ठाकरे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा
३६ वर्षीय डेल स्टेन मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. मागील वर्षी आयपीएल स्पर्धेतील दुखापतीतून सावरुन तो इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी मैदानात उतरला खरा पण त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत संघाची चांगलीच गोची झाली. वारंवारच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या नव्या करारातील पहिल्या यादीत त्याला स्थान देण्यात आले नव्हते.