पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'स्टेनगन' आफ्रिकेची पहिली पसंती राहिली नाही!

डेल स्टेन

दक्षिण आफिका क्रिकेट बोर्डाने २०२०-२१ या वर्षातील करार यादीतून अनुभवी जलदगती गोलंदाज डेल स्टेनला वगळले आहे. त्याच्याऐवजी ब्यूरॉन हेंड्रिक्सला पहिल्यांदा राष्ट्रीय करार यादीत स्थान मिळाल्याचे दिसते. दक्षिण आफ्रिका बोर्डाने अष्टपैलू ड्वेन प्रीटोरियस,  रासी वान डर डुसेन आणि जलदगती गेंदबाज एनरिक नॉर्टजे यांनाही करारबद्ध केलय. 

३६ वर्षीय स्टेनने दुखापतीतून सावरत फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२०विश्वचषकात त्याला दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र करारातूनच त्याला गायब केल्याने त्याच्या कारकिर्दीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  

कोरोना: गंभीर यांच्याकडून आर्थिक तर पठाण बंधूंकडून दान-धर्माची मदत

क्रिकेट दक्षिण अफ्रिका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी जॅक्स फॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ पुरुष आणि १४ महिलांना करारबद्ध करण्यात आले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी ही संख्या पुरेसी आहे, असेही ते म्हणाले. पुरुष गटात आणखी १७ जणांसोबत करार करणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली आहे.  

करारबद्ध पुरुष खेळाडू :
टेम्बा बाव्हुमा, क्विंटन डिकॉक, फाफ डुप्लेसी, डीन एल्गर, ब्यूरॉन हेंडरिक्स, रीजा हेंडरिक्स, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एंगिडी, एनरिच नॉर्टजे, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसेन.

कोरोना : श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून सरकारला कोट्यवधीची मदत

महिला खेळाडू:
तृषा शेट्टी, नेडाइन डिक्र्ल्क, मिगनोन डु प्रीज, शबनम इस्माइल, सिनालो जाफटा, मरिजाने काप, आयाबोंगा खाका, मसाबाता क्लस, लिजेले ली, सुने लुस, तुमी एस, चोले ट्रायोन, डेन वान नीकर्क, लौरा वोल्वार्ट.