पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020: ..तर स्टेन'गन' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल

डेल स्टेन आणि विराट कोहली

किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या डेल स्टेनने मुंबई इंडियन्सकडून खेळणे आनंददायी असेल, असे म्हटले आहे. दोन हंगामात रॉयल बंगळुरुकडून खेळलेल्या स्टेनला संघाने रिलिज केले. मागील हंगामात केवळ दोन सामन्यात तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. दोन सामन्यात १७.२५ च्या सरासरीने ४ बळी घेतले होते. 

संघाकडून सर्वोच्च धावसंख्या १० असूनही भारतीय महिलांनी मारली बाजी

खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. एवढेच नाही तर विश्वचषकालाही त्याला मुकावे लागले होते. रॉयल चॅलेंजर्सशिवाय डेल स्टेन डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैदराबाद आण गुजरात लायन्स या संघाकडूनही खेळताना दिसला होता.  

धोनीमुळेच शतक हुकलं होतं, तीन धावांची 'गंभीर' कहाणी

ट्विटरच्या माध्यमातून स्टेनने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला आयपीएलसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. एका चाहत्याने त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळायला आवडेल का? असा प्रश्न केला. यावर डेल म्हणाला की, जर मुंबई इंडियन्सने मला संधी दिली तर मी आनंदाने त्यांच्यासाठी खेळेने, असे डेल स्टेनने म्हटले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dale Steyn happy to deliver for Mumbai Indians The legendary fast bowler has shown interest in the upcoming IPL 2020