पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : नवीन कुमारची 'दबंग' कामगिरी! दिल्लीचा आणखी एक विजय

दबंग दिल्लीचा आणखी एक दमदार विजय

नवीन कुमारच्या दमदार चढाईच्या जोरावर पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीच्या शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये दंबग दिल्लीने आणखी एका विजयाची नोंद केली. प्रो कबड्डी लीगमध्ली ९४ व्या सामन्यात दबंग दिल्लीने तेलुगू टायटन्सला ३७-२९ अशा फरकांनी पराभूत केले. या सामन्यात नवीन कुमारने आपल्या कामगिरीत सुधारणा करत या हंगामातील १५ वा आणि सलग १४ वेळा सुपर १० ची कामगिरी केली. बचाव फळीत रविंद्र पहल आणि अनिल कुमार यांनी प्रत्येकी ४-४ गुण मिळवत नवीन कुमारला उत्तम साथ दिली. 

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका

पहिल्या सत्रात दोन्ही संघानी सावध खेळ दाखवला. दबंग दिल्लीचा संघ सिद्धार्थ देसाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील दिसला. तर तेलुगू टायटन्सने नवीन एक्स्प्रेससाठी मजबूत बचावपटूंसह खेळाला सुरुवात केली होती. दरम्यान पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्सचा कर्णधार अबुझार मेघानी याने प्रो कबड्डीच्या इतिहासातील  १५० टॅकल पॉइंट्स आपल्या नावे केले. 

PKL : पुण्याच्या मैदानात विक्रमी धमाका!

दुसऱ्या सत्रात दबंग दिल्लीने आक्रमक खेळ केला. नवीन एक्स्प्रेस रंगात आल्याच्या पाहायला मिळाले. ३१ व्या मिनिटाला दिल्लीने तेलुगू टायटन्सला ऑल आउट करत ११ गुणांची आघाडी घेतली. नवीन कुमारने या सत्रात सुपर १० चा सलग चौदाव्यांदा पराक्रम करुन दाखवला. या विजयासह दबंग दिल्ली १६ सामन्यानंतर ६९ गुणासह अव्वलस्थानी कायम आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Dabang Delhi defeated Telugu Titans with a score line of at Shree Shiv Chhatrapati Sports Complex Mahalunge Balewadi Pune