पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लंकेविरुद्धच्या सराव सामन्यात आफ्रिकेचा डंका!

 सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकाने मारली बाजी

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषकापूर्वी खेळवण्यात येत असलेल्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलकेंला ८७ धावांनी पराभूत केले. शुक्रवारी कार्डीफच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३८  धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४२.३ षटकात २५१ धावांपर्यंत मजल मारता आली. 

एडिन मार्करम आणि हाशिम आमला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. त्यांनी ६.२ षटकात धावफलकावर ४७ धावा लावल्या. मार्करम बाद झाल्यानंतर हाशिम आमलाने फाफ ड्युप्लेसीसच्या साथीने १२८ धावांची भागीदारी रचली. त्याने ६५ तर आयपीएलच्या मैदानात आपला फॉर्म दाखवणाऱ्या फाफ डयुप्लेसीने केलेल्या ८८ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेसमोर मोठी धावसंख्या उभारता आली. दक्षिण आफ्रिकेने तळाच्या फलंदाजांच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३८ धावा पर्यंत मजल मारली.

ICC World Cup: भारतीय संघ कोणाविरुद्ध कधी अन् कोणत्या मैदानात भिडणार!

या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कुशल परेरा (०) आणि थिरुमाने (१०) धावा करुन तंबूत फिरले. त्यानंतर करुनारत्ने (८७) आणि मॅथ्यूज (६४) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी बाद झाल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी लंकेच्या तळाच्या फलंदाजीला थोडक्यात आटोपले. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुकवायोने सर्वाधिक (४/३६) विकेट घेतल्या.