पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीचे स्वप्न भंगले, चेन्नई पुन्हा फायनलमध्ये!

फाफ ड्युप्लेसी आणि वॉटसनची अर्धशतके

विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव करत दिमाखात फायनल गाठली. आता विजेतेपदासाठी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी लढत रंगणार आहे.  
दिल्लीने चेन्नई समोर 148 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने 6 गडी आणि 6 चेंडू राखून सामना खिशात घातला. चेन्नई सुपर किंग्जकडून फाफ ड्युप्लेसी (50) आणि शेन वॉटसन (50) यांनी संयमी खेळ दाखवत सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ही जोडी फुटल्यानंतर मैदानात आलेल्या रैना 11 तर धोनी 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतर अंबाती रायडूने 3 चौकाराच्या मदतीने 20 चेंडूत 20 धावा करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.   

IPL 2019: फायनलपूर्वी रोहित शर्माचे देव दर्शन

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशजनक झाली. सलामीवीर पृथ्वी शॉला अवघ्या 5 धावांवर दिपक चहरने माघारी धाडले. त्यानंतर फिरकीपटू हरभजनसिंगने धवनला 18 धावांवर चालते केले. तिसऱ्या विकेटसाठी मैदानात आलेल्या कॉलिन मुन्रोने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवत डावाला आकार देण्याची आशा पल्लवीत केली. मात्र रविंद्र जाडेजाने त्याला ब्रावोकडे झेल द्यायला भाग पाडले. मुन्रोने 27 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो 13 धावा करुन चालता झाला.

'ऋषभ पंत नव्या पिढीतील सेहवाग'

दिल्लीकडून ऋषभ पंतने पुन्हा एकदा एकाकी झुंज देत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 38 धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या फलंदाजांकडून केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. ईशांत शर्माने अखेरच्या षटकात केलेल्या फटेकबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 147 धावांपर्यंत मजल मारली होती. चेन्नईकडून चहर, हभजन, ब्रावो आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन तर इमरान ताहिरने एक बळी टिपला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CSK vs DC IPL 2019 IPL Qualifier 2 Chennai beat Delhi by 6 wickets to face Mumbai in final