भारतीय संघातील हुरहुन्नरी हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अफेयरच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. त्याने नताशा स्टॅनकोविचसोबतचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत तिच्यासोबतच्या नाते उघडपणाने स्वीकारले आहे. नव्या वर्षात आतषबाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत त्याने यंदा कर्तव्य आहे, असे संकेतच दिले आहेत.
2019 च्या अखेरच्या टी-20 सामन्यात राशिदची धुलाई
निशा गुप्ता, उर्वशी रौतेला, परिणिती चोप्रा ऐली अवराम या अभिनेत्रींशीही नाव जोडल्यानंतर हार्दिक पांड्याचे नताशासोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पांड्याने नताशासोबतच्या नात्यासंबंधातील वृत्त अनेकदा फेटाळून लावले होते. मात्र नव्या वर्षात तिच्यासोबतचा फोटो शेअर करत त्याने नात्याची उघडपणे कबूली दिली आहे. हार्दिक पांड्याने इन्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कृणाल पाड्यांची पत्नी पंखुरी शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक
पाठिच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. यशस्वी शस्त्रक्रियनंतर न्यूझीलंड दौऱ्यातून तो भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे. फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अ संघात त्याची निवड करण्यात आली आहे. दुखापतीनंतर स्वत:ला सिद्ध करण्याची त्याच्यासमोर कसोटी असेल.