पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः हरभजन सिंग ५ हजार कुटुंबांना वाटणार धान्य

हरभजन सिंग

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी लॉकडाऊनच्या या दिवसांत गरीबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हरभजनने टि्वट करुन ही माहिती दिली. आपल्या टि्वटमध्ये भज्जीने म्हटले की, तो आणि त्याची पत्नी गीता बसरा जालंधरमधील ५००० कुटुंबांना या संकटाच्या काळात धान्य उपलब्ध करुन देणार आहोत. 

बैठकीसाठी पंतप्रधानांचे निमंत्रण नाही, ओवेसी भडकले

भज्जीने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, सतनाम वाहेगुरु...फक्त हिम्मत आणि धैर्य दे..गीता बसरा आणि मी आजपासून हे व्रत घेतो की, आम्ही ५००० कुटुंबीयांना धान्य देऊ. वाहे गुरु आमच्या सर्वांवर कृपा कर. 

आपल्या टि्वटमध्ये हरभजनने काही छायाचित्रे शेअर करत संदेशही लिहिला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले की, देवाच्या आशीर्वादाने मी आणि गीता बसरा जालंधरमध्ये राहणाऱ्या ५००० अशा कुटुंबाना धान्य वाटणार आहोत. जे सध्या या संकटाच्या काळी आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. 

देशातील २७४ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, २६७ रुग्ण झाले बरे

भज्जीने आपल्या संदेशात पुढे लिहिले की, आम्ही आपल्या सहकारी नागरिकांचा भार कमी करण्याचा प्रयत्न करु. सुरक्षित राहा, घरातच राहा आणि सकारात्मक राहा. जय हिंद. 

हेच टि्वट गीता बसरानेही आपल्या टि्वटर हँडलवरुन पोस्ट केले आहे. हरभजननेही हे टि्वट रिटि्वट केले आहे. हरभजनसिंग पूर्वी काही क्रिकेटपटूंनी लॉकडाऊन काळात गरीब कुटुंबांना मदत केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cricketer harbhajan singh and geeta basra to distribute ration to 5000 families in jalandhar in lockdown period coronavirus