पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनचा गोलंदाजीतील हा विक्रम तुम्हाला माहितेय का?

तेंडुलकरने 270 डावात गोलंदाजी केली आहे. यात त्याने 153 बळी घेतले आहेत.

1974 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. 1974 पासून आतापर्यंत अनेकांनी काही खास  विक्रम आपल्या नावे केले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फलंदाजीमध्ये अनोखे विक्रम प्रस्थापित करत विक्रमादित्य अशी ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याच्या नावे गोलंदाजीमध्येही अनोख्या विक्रमाची नोंद आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे.

NZvIND T20: राहुल-श्रेयसची पुन्हा कमाल, भारताचा सलग दुसरा विजय

भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक डावात गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे.  या यादीत माजी जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ अव्वलस्थानी आहेत. पाकिस्तानविरुद्ध 18 ऑक्टोबर 1991 मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रीनाथ यांनी 2003 पर्यंत एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना  229 वनडे सामन्यात 227 डावात गोलंदाजी केली आहे. यात त्यांनी 315 बळी मिळवले असून 3 वेळा 5 बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे.  67 कसोटी सामन्यात श्रीनाथ यांच्या नावे 236 बळींची नोंद असून सध्या ते आयसीसीचे रेफ्री म्हणून कार्यरत आहेत.  

सुपर मॉमला पद्म विभूषण, हे आठ खेळाडू पद्म पुरस्काराचे मानकरी

1990 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट संघात आपल्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना नाचवण्याची किमया करणारे अनिल कुंबळे यांनी एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या  सामन्यातून 1990 मध्ये वनडेमध्ये  पदार्पण करणाऱ्या कुंबळे यांनी  271 एकदिवसीय सामन्यातील 263 डावात गोलंदाजी केली आहे. यात त्यांनी 337 विकेट घेतल्या आहेत.    

'जर भारत आला नाही तर आम्ही पण येणार नाही'

भारताकडून  1989 ते लेकर 2013 दरम्यान तब्बल दोन दकाहून अधिककाळ क्रिकटचे मैदान गाजवणाऱ्या सचिनने आपल्या मोठ्या कारकिर्दीत 463 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. सर्वाधिक एकदिवसीय सामन्याचा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या तेंडुलकरने 270 डावात गोलंदाजी केली आहे. यात त्याने 153 बळी घेतले आहेत. भारताकडून एकदिवसीयमध्ये सर्वाधिक डावात गोलंदाजी करणारा सचिन तेंडुलकर तिसरा खेळाडू आहे.