पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्णभेदीच्या टिप्पणीमुळे क्रिकेट चाहत्यावर कारवाई

जोफ्रा आर्चर

न्यूझीलंड दौऱ्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरविरोधात वर्णभेदी टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. न्यूझीलंडने या व्यक्तिवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलाय. ही बंदी तब्बल दोन वर्ष राहणार आहे.  त्यामुळे ऑकलँडमधील या व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये रंगणारे सामने दोन वर्ष मैदानावर जाऊन पाहता येणार नाहीत.  

INDvsAUS: तुझं रक्त कधी उसळणार? पंत पुन्हा ट्रोल

पोलिसांनी ऑकलँडमधील २८ वर्षीय तरुणाला वर्णभेदीच्या टिप्पणीवरुन ताब्यात घेतले होते. या तरुणाने आपली चूक मान्य केली. त्यानंतर त्याला तोंडी सूचना देऊन सोडण्यात आले. मात्र न्यूझीलंड क्रिकेटने त्याला माफ केले नाही. पाहुण्या संघातील खेळाडूसोबतच्या वर्णभेदी टिप्पणीबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रवक्ता एंथनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला २०२२ पर्यंत न्यूझीलंडमध्ये होणारा एकही सामना पाहता येणार नाही. त्याला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा करण्यात आली आहे. भविष्यात असे कृत्य केल्यास पोलिस योग्य ती कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले. 

INDvsAUS: ऋषभ जायबंदी, बढतीनंतर राहुलला विकेटमागेही मिळाली संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवसी इंग्लंड संघाचा पराभव वाचवण्यासाठी जोफ्रा आर्चरने चिवट खेळ केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसलेल्या फलंदाजाप्रमाणे सामना केला. त्याची खेळी पाहून न्यूझीलंडचा चाहता इतका अस्वस्थ झाला की त्याने जोफ्राला उद्देशून वर्णभेदी टिप्पणी केली. सामन्यानंतर आर्चरने याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने व्यक्तीचा शोध घेत त्याच्यावर कारवाई केली.