पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लव्ह मॅरेज करणार की अरेंज? स्मृतीने दिला असा रिप्लाय!

स्मृती मानधना

जगभरात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाने भारतालाही ठप्प केले आहे. कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी अनेक राष्ट्रांसह भारतामध्येही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान क्रिकेटसह अन्य खेळावर मोठा परिणाम झाला असून सर्व मैदाने ओस पडली आहेत. खेळाडू स्वत: घरीबसून आपल्या चाहत्यांना 'स्टे होम' चा संदेश देत कोरोनाच्या लढ्याविरोधात सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. भारतीय महिला संघाची स्फोटक आणि लोकप्रिय डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाही आपल्या सांगलीतील मूळ घरी असून ती सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार क्वॉरंटाईनच्या सूचनांचे पालन करत आहे. 

कोरोनाशी लढा : शास्त्रींसह भज्जीकडून PM मोदींना समर्थन

महिला विश्वचषकानंतर ती ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतल्यामुळे खबरदारी म्हणून स्मृती मानधनाला क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. ती या सूचनांचे तंतोतत पालन करत आहे. दरम्यान स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यात एका चाहत्याने प्रेम विवाह करण्यास पसंती देणार की ठरवून म्हणजे अरेंज करणार? असा प्रश्न विचारला होता. यावर स्मृतीने मजेशीर रिप्लाय दिलाय,  लव्ह-रेंज मॅरेज असे ट्विट तिने केले आहे. 

कोविड १९: मोदींकडून खेळाडूंना पाच सूत्री मंत्र! सचिन-विराटचाही सहभाग

याशिवाय एका चाहत्याने तिला तुला गजरचे घड्याळ आवडते का? असा प्रश्नही विचारला होता. या प्रश्नावरुन ती झोपेवर खूप प्रेम करते हेच समोर आले. गजरचे घड्याळ पंसतीच्या यादीत असावे याचा खूप प्रयत्न करते आहे. पण झोप मोड करणारी कोणतीही गोष्ट मला आवडत नसल्यामुळे तूर्तास याचा माझ्या आवडीच्या गोष्टीत समावेश झालेला नाही, असे तिने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धे भारतीय महिलांनी फायनल गाठली होती.पण पहिला विश्वचषक जिंकण्याचे महिला संघाचे स्वप्न अधूरेच राहिले होते. या स्पर्धेत भरवशाची फलंदाज स्मृती मानधना नावाला साजेसा खेळ करण्यात अयशी ठरली होती.