पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुहेरी हितसंबंध प्रकरण: सचिनला दिलासा नाहीच!

सचिन तेंडुलकर

भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात आज (मंगळवारी) पुढची तारिख देण्यात आली. या प्रकरणात सचिनला दिलासा मिळाला नसला तरी पुढील सुनावणीसाठी त्याला लवादापुढे स्वत: उपस्थित राहण्याची गरज नाही, अशी माहिती सचिनचे वकील अमित सिब्बल यांनी एएनआयला दिली आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी २० मेला होणार आहे. 

'सचिन, सौरव, लक्ष्मण या त्रिकुटाला विनाकारण लक्ष्य केलंय'

भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी  नोटीस बजावली होती. या प्रकरणात दोन्ही दिग्गजांना १४ मे ला लवादा समोर हजर राहण्यास सांगितले होते,.

सचिन म्हणतो मी लाभार्थी नाही!

सल्लागार समितीचे सदस्य असताना सचिन आणि लक्ष्मण आयपीएलमधील संघासोबत कार्यरत असल्याची तक्रार मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी केली होती. या तक्रारीनंतर बीसीसीआच्या लवादाने दोघांना नोटीस बजावली होती. दोन्ही क्रिकेटर्सनी नोटीस संदर्भात स्पष्टीकरण देताना आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cricket conflict of interest case against sachin tendulkar next hearing on 20th of may sachin tendulkar appearance not necessary