वर्ष २०१९ क्रिकेटसाठी चांगले वर्ष राहिले. त्याचबरोबर संपूर्ण दशकाबाबत बोलायचे म्हटले तर कसोटी क्रिकेटसाठी तर जबरदस्त राहिले. या दशकात अनिर्णीत ऐवजी कसोटी सामन्यांचे निकाल पाहावयास मिळाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दशकासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्याचा कर्णधारपदी विराट कोहलीला केले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
पंतला सुधारण्यासाठी बीसीसीआय काही करायला तयार
सलामीच्या जोडीसाठी या संघात अॅलेस्टर कुक आणि डेव्हिड वॉर्नरला निवडण्यात आले आहे. फलंदाजीच्या क्रमानुसार त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा क्रमांक येतो. विराट कोहलीला पाचव्या क्रमांकासाठी निवडले आहे. संघाची मधली फळी मजबूत दिसत आहे. कारण यामध्ये या दशकातील तीन सर्वांत यशस्वी फलंदाज विलियम्सन, स्मिथ आणि विराटच्या नावाचा समावेश आहे.
पुढच्या दोन मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीविषयीचा संभ्रम कायम
विराट कोहलीनंतर आता सहाव्या क्रमांकावर फलंदाज एबी डिव्हिलियर्सला निवडण्यात आले आहे. त्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचा क्रमांक येतो. स्टोक्सने अष्टपैलू म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला स्थान देण्यात आले आहे. नॅथन लायन या एकमेव फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले आहे.
पाक गोलंदाज अन् भारतीय सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निवडण्यात आलेली दशकातील कसोटी टीम पुढीलप्रमाणेः अॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लायन, जेम्स अँडरसन.