पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Cricket Record :यंदा विक्रमादित्याचे हे तीन विक्रम रनमशीनच्या रडारवर

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर

क्रिकेट जगतातील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि रनमशीन विराट कोहली यांच्यातील तुलना हा क्रिकेटमधील एक चर्चेचा विषय आहे. वास्तविकता सचिनचा काळ अन् विराट खेळत असलेला काळ वेगवेगळा असल्यामुळे दोघांच्यातील तुलना तात्विकदृष्ट्या अयोग्यच ठरेल. पण क्रिकेटच्या मैदानात कामगिरीच्या आकडेवारीनुसार, सचिनच्या कोणत्या विक्रमाच्या विराट किती जवळ पोहचला किंवा त्याने कोणता विक्रम मागे टाकला हा खेळ मात्र सुरुच राहिल. यंदाच्या वर्षी भारतीय संघाचा कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिनचे तीन विक्रम मागे टाकू शकतो. नजर टाकूयात याच काही खास विक्रमावर...   

Video : भारतीयाला चेंडू गिफ्ट देणाऱ्या पाक गोलंदाजाची अफलातून हॅटट्रिक

#एकदिवसीय सामन्यातील शतकांचा विक्रम

विराट कोहलीने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत २४२ एकदिवसीय सामनयात ४३ शतके झळकावली आहेत. क्रिकेट जगतात शतकांच्या शतकांचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे एकदिवसीयमध्ये ४९ शतकांची नोद आहे. यंदाच्या वर्षी विराट कोहली सचिनचा हा विक्रम मागे टाकू शकतो. एकदिवसीयमध्ये सात शतके करुन एकदिवसीयमधील शतकांचे अर्धशतक करायला विराट किती सामने घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. २०१९ मध्ये विराट कोहलीने अर्धशतकीय खेळी शतकात बदलण्यामध्ये फारसे यश आले नव्हते. वर्षाखेर त्याने ५ शतके झळकावली होती. या वर्षी तो एकदिवसीयमध्ये ७ शतके झळकवणार का? आणि त्यासाठी किती सामने घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

IndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके

#१२ हजार धावांचा टप्पा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलदगतीने १२ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. आतापर्यंत पाच फलंदाजांनी १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ३०० डावात सचिनने या विक्रमाला गवसणी घातली होती. इतर खेळाडूंना ३०० पेक्षा अधिक डाव खेळावे लागले होते. सचिनचा हा विक्रम मागे टाकण्याची विराटकडे संधी आहे. विराटने २३३ डावात ११ हजार ६०९ धावा केल्या आहेत. हा विक्रम सर करण्यापासून तो केवळ ३९१ धावा दूर आहे.  

या पाच दिग्गज क्रिकेटर्सच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

#घरच्या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ शतकापैकी १९ शतके ही घरच्या मैदानावर केली आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. मायदेशात खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात सचिनच्या नावे २० शतके आहेत. या यादीत अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी विराट कोहलीला दोन शतकांची आवश्यकता आहे. जानेवारीतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतामध्ये येणार आहे. या दरम्यान विराट कोहली दोन शतके ठोकून सचिनच्या पुढे जाणार की यासाठी त्याला आणखी प्रतिक्षा करावी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.