जीवघेण्या कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वत:ला आपापल्या घरामध्ये सक्तीने बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे तांडव थांबवण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही पर्यात नाही, अशा आशयाचा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सेलिब्रेटी आपापल्या परिने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहेत.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी नरेंद्र मोदींनी सोपविली यांच्यावर...
उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो शेअर करत आपल्या कुटुंबियांसह देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा संदेश दिलाय. उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केलेला धोनीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'लॉकडाऊन' झालेल्या गरीबांसाठी केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा
इंग्लंडमध्ये मागील वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा धोनी धावबाद झालेला क्षण क्रिकेट चाहत्यांना आठवल्याशिवाय राहत नाही. धोनी धावबाद झाला तिथेच आपण पराभूत झालो, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. तो सुरक्षित क्रिजमध्ये पोहचला असता तर सामन्याचा निकाल आपल्या बाजूने असता असेही बोलले गेले. याच क्षणाचा फोटो शेअर करत सुरक्षिततेसाठी घरामध्ये राहण्याचा संदेश उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलाय. आपल्याला कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा आहे, या कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आलाय. घरामध्ये आपली आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे, असाच संदेश यूपी पोलिसांनी दिला आहे.