पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-19 : कोहली ब्रिगेडला दिलाय असा इनडोअर टास्क!

कोरोनामुळे स्पर्धा सराव सर्व स्थगित करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पुढील तीन आठवडे कोणीही घराबाहेर पडू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कठोर पाऊल उचलले. सध्य परिस्थितीला खेळाच्या सर्व स्पर्धाही स्थगित आहे. क्रिकटर्स आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

गहू दोन, तर तांदूळ तीन रुपये किलोने मिळणार, केंद्राची घोषणा

खेळाच्या मैदानापासून दूर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंच्या शारिरिक आणि मानसिक सक्षमतेसाठी निक बेब आणि फिजिओ नितिन पटेल यांनी खास इनडोअर वर्कआउट प्लन तयार केलाय. सरावापासून मैदानबाहेर असतानाही फिट राहण्यासाठी याचा खेळाडूंना फायदा होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने ज्या खेळाडूंसोबत करार केला आहे त्या सर्व खेळाडूंना एक विशेष फिटनेस रुटीन देण्यात आले आहे. सर्व खेळाडूंना हे वर्कआउट करावे लागणार असून याची वेळोवळी माहिती देखील वेब आणि पटेल यांना द्यावी लागणार आहे. 

लॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम

गोलंदाज, फलंदाज यांना वेगवेगळा व्यायाम करण्यास सांगण्यात आले आहे. गोलंदाजासाठीच्या टास्कमध्ये लोअर बॉडीवर भर दण्यात आला असून फलंदाजासाठीच्या व्यायामामध्ये खांदा आणि मनगटाची हालचाल अधिक होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.  खेळाडूंच्या पसंतीनुसार वर्कआउट प्लॅन आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उदाहरण देताना ते म्हणाले की, कर्णधार विराट कोहली वजनासह व्यायाम करणे पसंत करतो. त्यामुळे त्याच्यासाठी वजनावर भर असणारा व्यायाम टास्क देण्यात आला  आहे. एखादा खेळाडू वजनाशिवाय व्यायामाला प्राधान्य देत असेल तर त्याच्यासाठी त्यापद्धतीने आखणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.