पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मितालीकडून १० लाखांची मदत, संकटाचा सामना करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन

मिताली राज

कोरोना विषाणूच्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन महिला क्रिकेटर मिताली राज देखील मदतीसाठी पुढे आली आहे. मितालीने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ५ लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपयांची दान केले आहेत. यापूर्वी भारतीय संघाचाकर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अनुष्का शर्मा या जोडीने महाराज्य राज्य सरकार आणि पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये तब्बल ३ कोटींची मदत दिली होती.

कोरोनाशी लढा: रिलायन्सकडून ५०० कोटींची मदत

खेळाच्या मैदानातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरु आहे. यापूर्वी महिला बॉक्सर मेरीकोमने एक लाख, पीव्ही सिंधू  १० लाख रुपयांची मदत केली आहे. 
जगभरात थैमाना घातलेल्या कोरोना विषाणूने देशात वेगाने संक्रमण होत आहे. आतापर्यंत भारतात हजारहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. २९ जणांचा कोरोनाने बळी घेतलाय. २४ मार्चपासून देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.  

कोरोना: पी. चिदंबरम यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला १ कोटींची मदत

कोरोना विषाणूच्या संक्रमणाची वाटचालही तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने सुरु आहे. मर्यादित स्वरुपात तिसऱ्या टप्याला सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले असून त्यामुळे पुढचे काही दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. केंद्र सरकार, प्रत्येक राज्यातील राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून कोरोनाचा सामना करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:covid 19 mithali raj donated 10 lakh rs said All of us need to join hands in this fight against the deadly coronavirus