कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपासून दूर राहायचं याचा अर्थ त्यांना समाजातून बाहेर ढकलायचे नाही, असा भावनिक संदेश मास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत बहुमूल्य असा संदेश दिलाय. ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे दुजाभाव करु नये, असे सचिनने म्हटले आहे.
सचिनने कोरोना विरोधातील लढाईत प्रधानमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यात प्रत्येकी 25-25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. एवढ्यावरच तो थांबलेला नाही. तर कोरोनामुळे सामाजिक दूरावा निर्माण होणार नाही याचीही आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल, असा संदेश सचिनने व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय.
कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली
सचिनने म्हटलंय की, 'समाजिक जबाबदारीचे भान ठेवूनच आपण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत योग्य वर्तन करणे अपेक्षित आहे. तो दुखावला जाईल, अशी वागणूक त्याला आपण द्यायची नाही. कोरोनाशी लढा देत असताना सूचनेनुसार आणि आवश्यकतेप्रमाणे खबरदारी नक्की घ्यावी मात्र कोरोनाग्रस्ताला समाजा बाहेर ढकलायचे नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी, अशी भावना सचिनने व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या चाहत्यांना ICC ने दिला हा पर्याय
यापूर्वी सचिनने कोरोना विषाणूच्या संकटाला सामना करताना आपण कशी काळजी घ्यावी, यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला होता. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून मी घरात आहे तुम्ही ही घरातच थांबायला हवे, असे आवाहन सचिनने केले होते. काही लोक यापरिस्थितीतही क्रिकेट खेळत असल्याचे काही व्हिडिओ पाहिले. ही गोष्ट अयोग्य आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनेच पालन करुन आपल्याला कोरोनाविरोधातील सामना जिंकायचाय, असे सचिनने म्हटले होते.
एक समाज के तौर पर हमारी ज़िम्मेदारी है कि हम में से जो लोग positive टेस्ट हुए है, उन्हें हमारा स्नेह मिले और हम उन्हें शर्मिंदा महसूस ना कराएँ।#SocialDistancing बनाएँ रखे पर उन्हें समाज से दूर ना करे।#CoronaVirus के ख़िलाफ़ इस जंग को हम जीत सकते है, बस एक दूसरे का सहयोग करें। pic.twitter.com/btSYtSAiCz
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2020