पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय चाहत्यांनी वॉर्नरला दिला 'रामायण-महाभारत' पाहण्याचा सल्ला

डेव्हिड वॉर्नर

कोरोना व्हायरसविरोधातील सामना जिंकण्यासाठी भारतासह ऑस्ट्रलियातही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे जवळपास सर्वच खेळ प्रकारातील खेळाडूंवर सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा सल्ला देत काही खेळाडू घरामधूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला लॉकडाऊनच्या परिस्थितीत काय करावे? असा मोठा प्रश्न पडलाय. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्राला 'विरुष्का'ची मदत

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या मनात निर्माण झालेला प्रश्न त्याने व्यक्त केलाय. नेमक काय कराव सूचत नाही. असे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय चाहत्यांनी त्याला चक्क 'रामायण' पाहण्याचा सल्ला दिलाय. प्रतिस्पर्धी संघाला हैराण करण्याची क्षमता असणाऱ्या वॉर्नरचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर सनायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेसह ऑस्ट्रेलियात रंगणारी आगामी टी-२० स्पर्धाही संकटात आली आहे. सध्याचे वातावरण निवळण्यासाठी नक्की किती वेळ लागेल याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.  

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अजिंक्य रहाणेकडून १० लाखांची मदत

वॉर्नरने ट्विटमध्ये लिहिलंय की,  'घरात काय करावे यासाठी माझ्याकडील सर्व कल्पना संपल्या आहेत. यावर भारतीय चाहत्यांनी त्याला 'रामायण' आणि 'महाभारत' पाहण्याचा सल्ला दिलाय. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपील चषक उंचावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉल टेम्परिंग प्रकरणामध्ये दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियन संघासह सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्वही गमावले होते. शिक्षेनंर त्याने ऑस्ट्रेलियन संघात धमाकेदार पदार्पण केले. एवढेच नाही तर सनरायझर्स हैदराबादने त्याच्याकडे पुन्हा नेतृत्वाची धूरा सोपववण्याचा निर्णय घेतला होता.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:covid 19 coronavirus updates david warner asked fans what should i do in house indian fans gave funny reply