भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास संदेश दिलाय. लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवानी मशीदमध्ये प्रार्थनेला न जाता घरीच नमाज पठण करावे, असे त्याने म्हटले आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने हे आवाहन केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे जगात दहशत निर्माण केली आहे. भारतातही विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
'हनुमानासारखा पर्वत उचलायचा नाही, घरी थांबूनच जयंती साजरी करा'
कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. गर्दी टाळून नागरिकांनी कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करण्याचा सल्ला दिलाय.
जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...
इरफानने व्हिडिओमध्ये म्हटलंय की, मशीदीमध्ये जाण्यास तुमच्यावर निर्बंध घालण्यात आलेले नाही तर प्रत्येक घराला मशीदच स्वरुप देण्यीची ही वेळ आहे, असा विचार करा, असेही इरफानने म्हटले आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन इरफानने यापूर्वीही केले होते. जगभरात बाह लाखाहून अधिक लोक कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. सत्तर हजारहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.