पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशिया चषक : भारत-पाक लढतीवरही कोरोनाचे सावट

भारत-पाक यांच्यातील लढतीमुळे या स्पर्धेची क्रिकेट चाहते  उत्सुकते वाट पाहत होते.

कोरोना विषाणूच्या तांडव नृत्यामुळे जगभरातील क्रीडा क्षेत्रातील बहुप्रतिक्षित स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यात आत आणखी एका स्पर्धेची भर पडणार आहे. सप्टेंबरमध्ये नियोजित आशिया  चषक टी-20 स्पर्धेवरही चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. यंदाच्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. यासंदर्भात निर्णयासाठी आयोजित करण्यात आलेली आशियाई क्रिकेट असोसिएशनची बैठकच स्थगित करण्यात आली आहे. बैठक स्थगित झाल्यामुळे या स्पर्धेवरही संकटात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.   

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

भारत-पाक यांच्यातील ताणलेले गेलेल्या संबंधामुळे दोन्ही देशातील क्रिकेटला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या मोठ्या स्पर्धेनंतर आशिया चषकात दोन्ही संघ आमने सामने खेळताना दिसतील त्यामुळे या स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता होती. पण या स्पर्धेलाही ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. 

भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे स्पर्धेचा तिढा सोडवण्यासाठी आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पण दुसऱ्यांदा त्यांना ही बैठक होऊ शकलेली नाही. 

राज्यात कोरोनाचे १२५ रुग्ण, नागपूरात १ तर मुंबईत दोघांची भर

भारताशिवाय या स्पर्धेत यजमान पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास इच्छूक नसला तरी इतर संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवणे शक्य होईल का? यावरही आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत चर्चा होणार होती. पण आता स्पर्धेवरच कोरोनाचे सावट असल्याचे दिसत आहे.