पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील गरजू लोकांना मदत करत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या परिस्थितीत शाहिद आफ्रिदी करत असलेल्या कामाचे भारतीय क्रिकेटर्स युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी कौतुक केले होते. परिणामी दोघांनाही भारतीय चाहत्यांने ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.
आफ्रिदीला सपोर्ट दिल्याने युवी-भज्जी झाले ट्रोल
No religion,no cast, only humanity..that’s what it is.. stay safe stay home..spread love not hate or virus.. let’s pray for every single one.. May waheguru bless us all 🙏🙏🙏🙏 #BeKind #BreakTheChain #coronavirus pic.twitter.com/evPob7er0F
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 1, 2020
युवराज सिंगने ट्रोल करणाऱ्यांना सुनावल्यानंतर आता भज्जीने त्यांची (ट्रोल करणाऱ्यांची) फिरकी घेतलीय. हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यासह त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, कोणताही धर्म ना जात फक्त माणूसकी बाळगा. सुरक्षिततेसाठी आपापल्या घरातच थांबा. प्रेम पसरवा तिरस्कार आणि व्हायरस पसरवू नका. असा संदेश देत भज्जीने ट्रोल करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली आहे.
कोरोना: क्रिकेटपटूंच्या पगारातही कपात होण्याची शक्यता
भज्जी आणि युवीने आफ्रिदीच्या मदत कार्याला सलाम केले होते. आफ्रिदीची सामाजिक संस्था पाकिस्तानमध्ये उत्तम कार्य करत असून त्याला हातभार लावण्यासाठी मदतीचा हात पुढे करा, असेही या जोडीने म्हटले होते. त्यांनी आफ्रिदीचे समर्थन केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांना भज्जी आणि युवीला भारत-पाक यांच्यातील संबंधाचे दाखले देत ट्रोल करण्यात आले. युवीने यावर स्पष्टीकरण दिले होते. कोणाचीही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी भारतीय असून भारतीयच राहिन. पण माणूसकी कधीच विसरणार नाही. जय हिंद! असे ट्विट युवीने केले होते.