पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: क्रिकेटपटूंच्या पगारातही कपात होण्याची शक्यता

कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धेवरही संकट ओढावले आहे.

कोरोना विषाणूनं संपूर्ण जगासमोर मोठे संकट निर्माण केले आहे. क्रीडा क्षेत्रालाही  मोठा फटका बसला आहे. जगभरातील अनेक खेळ स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. काही आयोजकांनी स्पर्धेला स्थगिती दिली असून काही प्रमाणात नुकसान भरुन काढण्यासाठी स्पर्धेबाबत अजूनही सकारात्मक आहेत. बीसीसीआयकडून घेण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेबाबतही असाच विचार सुरु आहे. ही स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला सर्वाधिक फटका बसणार आहे.

आफ्रिदीला सपोर्ट दिल्याने युवी-भज्जी झाले ट्रोल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील खेळाडूंच्या वेतनामध्ये कपात होण्याची शक्यता भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. जगभरातील अनेक देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. परिणामी जीवघेण्या विषाणूल लढा देण्यासाठी खेळाची मैदानावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक स्पर्धा स्थगिती करण्यात आल्या असून काही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे.

कोरोनाशी लढा: आर्थिक मदत करणाऱ्या कलाकारांचे पंतप्रधानांकडून कौतुक

मल्होत्रा म्हणाले की, या परिस्थितीत बीसीसीआयला कोणत्याही माध्यमातून उत्पन्न होत नाही. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या आणि आर्थिक घडी सावरण्याच्या हेतूने खेळाडूंच्या वेतनात कपात करावी लागू शकते. खेळाडूंनी आतापासून याची तयारी करायली हवी, असेही मल्होत्रा यांनी म्हटले आहे. जगभरात जवळपास साडे आठ लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. भारतातील आकडाही वेगाने वाढत असून देशात सध्या तेराशेहून अधिक लोक कोरोना विषाणूच्या जाळ्या अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा, यूरो चषक फुटबॉल स्पर्धा, आयसीसी टी-20 वर्ल्ड या स्पर्धेवर संकट ओढावले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus updates indian cricketers association president said virat kohli and company may face pay cut due to covid 19 pandemic