पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा : शास्त्रींसह भज्जीकडून PM मोदींना समर्थन

रवी शास्त्री

 भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी कोरोनाच्या लढ्यात मोदींनी केलेल्या आवाहनाचे समर्थन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतवासियांना खास संदेश दिलाय. रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे बंद करुन मेणबत्ती, टॉर्च, फ्लॅश लाइट नऊ मिनिटे प्रज्वलित करुन एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे. 

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधित बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला अंधकार दूर करण्यासाठी आणि आपण सर्व एकमेकांसोबत असल्याचे दर्शवण्यासाठी लोकांनी हा उपक्रम करावा, असे मोदींनी सूचवले आहे. पंतप्रधान मोदींच्या संदेशानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केलीय. 
शास्त्रींनी  ट्विटमध्ये लिहिलंय की, मेणबत्ती, टॉर्च, फ्लॅश लाइटच्या माध्यमातून आपण पाच तारखेला एकजूट दाखवून देत मोदींच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद द्याययाचा आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी या उर्जेची गरज आहे, अशा आशयाच्या ट्विट करत शास्त्रींनी मोदींना समर्थन दिले आहे.  

कोविड १९ : शाब्बास! क्रिकेटपटूनं उचलली ३५० कुटुंबियांची जबाबदारी

क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील ट्विटच्या माध्यमातून मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा संदेश दिला आहे. मोदींच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन मोदींना साथ द्यावी आणि कोरोनाच्या लढ्या सहभागी व्हावे, असे भज्जीने म्हटले आहे. मोदींच्या आवाहनानंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus pandemic Team India Coach Ravi Shastri and Spinner Harbhajan Singh laud PM Narendra Modi call for unity