पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढ्यासाठी सचिन आला धावून, सर्वात मोठी आर्थिक मदत

सचिन तेंडुलकर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर कायमच सामाजिक कामासाठी सढळ हाताने मदत करीत असतो. यावेळीही त्याने आपली संवेदनशीलता दाखवून देत कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत दिली आहे. सचिन तेंडुलकरने केंद्र सरकारला २५ लाख तर राज्य सरकारला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. भारतातील एखाद्या खेळाडूने कोरोनाशी लढा देण्यासाठी एवढी मोठी थेट आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

केंद्र सरकारचे पॅकेज शेतीसाठी पुरेसे नाही - शरद पवार

सचिन तेंडुलकर पंतप्रधान सहायता निधीला २५ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये देणार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जी कामे केली जात आहेत. त्याला मदत म्हणून त्याने हा निधी देण्याचे ठरविले आहे. सूत्रांनी ही माहिती पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

इतरही काही क्रिकेटपटूंनी आपापल्यापरीने सरकारला मदत देऊ केली आहे. इरफान आणि युसूफ पठाण या दोघांनी बडोदा पोलिसांना ४००० मास्क दिले. महेंद्रसिंह धोनीने पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचा तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

महासंकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका : आरोग्यमंत्री

भारतात कोरोना विषाणूची ७०० हून अधिक नागरिकांना लागण झाली असून, यामध्ये आतापर्यंत १७ जणांचा बळी गेला आहे.