पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढताना धर्मापलिकडे जाऊन विचार करा : अख्तर

अख्तर

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारत-पाकिस्तान या आशियाई राष्ट्रांसह युरोपात या विषाणूने कहर केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार या विषाणूला थोपवण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान पाकचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या चाहत्यांसाठी खास संदेश दिला आहे. कोरोनाचा सामना करताना हिंदू-मुस्लिम, श्रीमंत आणि गरिब असा भेदभाव करुन चालणार नाही. ही वेळ माणूसकी दाखवण्याची आहे, असा संदेश अख्तरने दिला आहे. 

रोनाल्डोच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण

अख्तरने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने जगभरातील प्रत्येक नागरिकाने जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचना पाळाव्या, असे आवाहन त्याने केले. जागतिक संकटाकडे धार्मिकतेच्या आणि अर्थिक चाकोरीतून न पाहता माणूसकीच्या नजरेतून पाहा, असा संदेश अख्तरने दिलाय. तुमच्या आमच्या संरक्षणासाठीच लॉक डाऊनची घोषणा करण्यात येत आहे. याला झुगारुन घराबाहेर पडाल तर संकटावर मात करता येणार नाही, असेही त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले. 

ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याचे संकेत

लॉक डाऊनच्या दरम्यान अनेकजण गरजेच्या वस्तूंचा साठा करण्यावर भर देताना दिसत आहेत. याचा उल्लेख करुन रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा विचार करुन साठा करणे थांबवा, असा सल्लाही त्याने नागरिकांना दिलाय. संकटात सापडलेल्या मदत करत असताना कोणत्याही स्वरुपाचा दुजाभाव होणार नाही, याचीही खबरदारी घ्या. आपले वर्तन हे माणूसकीला साजेशे असायला हवे, असा उल्लेखही त्याने आपल्या व्हिडिओमध्ये केलाय. यापूर्वी अख्तरने चीनवर हल्लाबोल केला होता.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus pandemic is a global crisis time to be human not hindu or muslim says shoaib akhtar