पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड १९ : शाब्बास! क्रिकेटपटूनं उचलली ३५० कुटुंबियांची जबाबदारी

शाहबाद नदीम

कोरोना विषाणूच्या संकटाला थोपवण्यासाठी भारतीय खेळाडू मैदानात उतरुन गरजू लोकांची मदत करताना दिसत आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने लक्षवेधी कामगिरी करत असलेल्या शाहबाज नदीमनेही पुढाकार घेतलाय. झारखंडच्या या क्रिकेटपटूने तब्बल  ३५० कुटुंबियांची जबाबदारी उचलली आहे.  
शाहबाद सध्याच्या घडीला झरिया येथील आपल्या घरी आहे. त्याने आपल्या परिसरातील ३५० कुटुंबियांना मदत करण्याचा संकल्प केलाय.

कोविड १९: मोदींकडून खेळाडूंना पाच सूत्री मंत्र! सचिन-विराटचाही सहभाग

शाहबादनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की, आतापर्यंत मी आमच्या परिसरातील १५० कुटुंबियांपर्यंत पोहचलोय. आणखी २००  कुटुंबियांपर्यंत सामान पोहचवायये आहे. कुटुंबियांना सामान देत असताना तांदूळ, डाळ, भाजी आणि साखर या महत्त्वपूर्ण वस्तू देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्याने म्हटले आहे.

कोविड-१९ : रिपोर्ट निगेटिव्ह! खेळाडू पुढील काही दिवस लॉकडाऊन राहणार

३० वर्षीय शाहबाद नदीम मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले आहे. त्याने हा सामना झारखंडमधील रांचीच्या मैदानात खेळला होता. आयपीएलविषयी देखील त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नदीम म्हणाला की, सध्याच्या घडीला आरोग्य हीच प्राथमिकता आहे. खेळाडूसाठी खेळाचे मैदान हेच पहिले प्रेम असते पण सध्याची परिस्थिती ही कठीण असून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकत्र लढायला हवे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus pandemic indian cricketer Shahbaz Nadeem helping 350 needy families says I believe in providing direct aid in lockdown