पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किवींनाही कोरोनाची धास्ती, खेळाडू १४ दिवस बंद रुममध्ये राहणार

न्यूझीलंड संघातील खेळाडूंना क्वॉरंटाईनच्या सूचना

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करुन न्यूझीलंडचा संघही मायदेशी परतला असून संघातील खेळाडूंनी स्वत:ला  क्लॉरंटाईन केलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने संघातील खेळाडू १४ दिवस क्वॉरंटाईनवर असल्याची पुष्टी दिली आहे.

'राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर, दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर'

कोरोना विषाणूमुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका रद्द झाली. न्यूझीलंडच्या संघातील १५ खेळाडूंसह इतर स्टाफने स्वत:ला घरात बंद करुन ठेवले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेच्या पाश्वभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.  न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मुख्यालयामध्ये खेळाडूंना  क्वॉरंटाईन संदर्भातील सर्व माहिती दिली होती. यासोबतच बोर्डाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चा आदेश देण्यात आला आहे.  

हे युद्ध विषाणूविरोधात, सर्वांनी सहकार्य करावे: मुख्यमंत्री

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या  एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा प्रेक्षकांशिवाय बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात न्यूझीलंडला ७१ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर उर्वरित दोन सामने रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संगनमताने घेतला होता. यापूर्वी भारताचा दौरा रद्द करुन मायदेशी परतलेल्या दक्षिण आफ्रिका संघानेही क्वॉरंटाईनचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus pandemic entire new zealand to go in self isolation after returning from Australia