जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने देशातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या संकटातून सावरण्यासाठी आता मदतीचा ओघही सुरु झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारला कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी देणगीच्या स्वरुपात ५० लांखाची मदत जाहीर केली आहे.
आशिया चषक : भारत-पाक लढतीवरही कोरोनाचे सावट
एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधातील लढ्यात मदतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी एक खास बैठक बोलावली होती. अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत राज्य सरकारला ५० लांखाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
COVID-19: ओडिशा सरकार उभारणार देशातील सर्वात मोठे रुग्णालय
देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. हा आकडा दिवसागणिक वाढताना दिसतो. कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक संस्था, खेळाडून कोरोनाच्या लढ्यात सरकारला आर्थिक मदत देऊन साथ देत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील पुढाकार घेत सर्वोत्परी सरकारला मदतीची तयारी दर्शवली आहे.