पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोनाल्डोच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण

आघाडीचा खेळाडूलाही कोरोनाची लागण

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत जुवेंटस क्लबच्या ताफ्यातील आघाडीचा खेळाडू पाउलो डायबाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. इटलीच्या सॉकर क्लबने यासंदर्भातील माहिती दिली आहे. जुवेंटस क्लबचा तिसरा खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकला आहे. यापूर्वी डेनियल रुगानी आणि ब्लेस मातुदी यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते.

ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याचे संकेत

दुसरीकडे इटलीचा दिग्गज फुटबॉलर पोओलो मालदिनी यांच्यासह त्यांचा मुलगा डेनियलही कोरोनाग्रस्त असल्याचे वृत्त आहे. इटालियन क्लब एसी मिलानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  एसी मिलानने स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, मालदीनी हे  कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. लक्षणं दिसू लागल्यामुळे त्यांची कोरोनासंदर्भात चाचणी घेण्यात आली होती. यात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. मालदिनी यांचा मुलगा डेनियल यालाही कोरोनाची बाधा झाली असून दोघांनाही घराबाहेर न पडता घरातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूने पाच हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटली क्लबकडून खेळणारे १४  खेळाडू कोरोनाच्या विळख्यात आहेत.

महिला क्रिकेटरशी गैरवर्तनाच्या आरोपात प्रशिक्षकाचे निलंबन