पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी 'प्रोटोकॉल'

खेळाडूंना चाहत्यांच्या गराड्यापासून दूर राहण्याच्या सूचना

क्रिकेट सामन्यादरम्यान चाहते नेहमीच स्टार क्रिकेटर्ससोबत सेल्फी आणि त्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना क्रिकेटर्सच्या सहवासात जाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने देशातही दहशतीचे वातावरण आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. याच पार्श्वभूमीवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिके दरम्यान भारतात दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेन संघाला काही खास सूचना देण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील पती-पत्नी दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य मंत्र्यांनी दिली पुष्टी

क्विंटन डिकॉक आणि फाफ डुप्लेसी यांना सूचना पत्रकाच्या माध्यमातून खबरदारी आणि उपायाच्या संदर्भात काही सूचना देण्यात आल्याचे समजते. यात प्रेक्षकांसोबत संवाद टाळणे त्यांच्यासोबत सेल्फी न काढणे तसेच हस्तांदोलन न करणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही नियमावली केवळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी नाही तर आगामी आयपीएल स्पर्धेसाठीही लागू असेल, असेही बोलले जात आहे.  

कोरोनाच्या जलद निदानासाठी NIV कडून स्पेशल मेडिकल किट्सची मागणी

दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना कोरोना विषाणुपासून खबरदारी आणि उपाय यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशातून यात्रा करुन आलेल्या खेळाडूंना स्वत:सह आपल्या सहकार्यांना अरोग्याच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. यात क्रिकेट चाहत्यांसोबत सेल्फी न काढणे त्यांच्यासोबत हस्तांदोलन न करणे यासह अन्य काही सूचनाही समाविष्ट आहेत. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळणार असल्याचेही संकेत दिले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus impact Proteas advised against fan interactions selfies on tour with rising coronavirus cases in India