पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी

इग्लिश क्रिकेटमध्ये नव्या प्रारुपावर काहींनी आक्षेप नोंदवला आहे.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी वादग्रस्त  'हंड्रेड  टूर्नामेंट' ( प्रत्येक संघ शंभर चेंडू खेळण्याची स्पर्धा) आयोजित करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष टॉम हॅरिसन यांनी म्हटले आहे. ईसीबीने मागील आठवड्यात इंग्लंडमधील या वर्षीच्या हंगामाच्या सत्राची सुरुवात जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भात बुधवारी बैठक पार पडणार असून यावेळी 'हंड्रेड टूर्नामेंट'च्या आयोजनाच्या मुद्यावरही चर्चा अपेक्षित आहे.  

सचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज

हंड्रेड टूर्नामेंटमध्ये प्रत्येक संघाला १०० चेंडू खेळण्याची संधी मिळेल. क्रिकेटमधील हा एक नवा प्रकार आहे. या प्रकारच्या स्पर्धेबाबत यापूर्वी टीकाही झाली आहे. या स्पर्धेत इंग्लिश  क्रिकेटच्या प्रथम श्रेणीतील १८  काउंटीशिवाय आठ फ्रेंचायजी संघ सहभागी असतील. परिस्थिती अनुकूल झाली तर ईसीबी जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात करु शकते. क्रिकेटमधील नवा प्रकार हा नव्या चाहत्यांना आकर्षिक करण्यास फायदेशीर ठरेल, असे ईसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. क्रिकेटच्या भविष्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याचेही इंग्लंडमधील काही मंडळीचं मत आहे. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे.  याचा खेळावर देखील परिणाम झाला आहे. जीवघेण्या कोरोनामुळे आर्थिक संकटही हळूहळू गडद होतानाचे चित्र असताना नव्या स्वरुपातील स्पर्धेच्या आयोजनावरही संभ्रमाचे वातावरण आहे.  

'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'

स्पर्धेबाबत हॅरिस म्हणाले की, सध्याच्या घडीला नवीन प्रारुपातील स्पर्धेसाठी परिस्थिती अनुकूल होईल का? याची प्रतिक्षा करावी लागेल. नव्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे स्वरुप तयार केले आहे. स्टेडियममधील माहोल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार का? हे अस्पष्ट असल्याने स्पर्धा किती यशस्वी ठरेल, हे सांगणे कठिण आहे. इंग्लिश क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून या प्रारुपाला विरोध होत आहे. ही स्पर्धा आयोजित करण्याऐवजी टी-२०  ब्लास्ट आणखी चांगल्या पद्धतीने खेळवण्याचा विचार  करावा, असाही कल दिसून आल्याचे देखील हॅरिस यांनी बोलून दाखवले.