पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका गांधींचे नाव चर्चेत आले होते. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रियांका गांधींच्या नावाला पसंती दिली होती. त्यानंतर काँग्रेसला गांधी घराण्यातील अध्यक्षच मिळणार, अशी चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली. मात्र आता स्व:ता प्रियांका गांधी अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे समोर येत आहे.  

'काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी सर्वोत्कृष्ट पर्याय'

काँग्रेस पक्षाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत माझे नाव नको, असेही त्यांनी पक्षातील नेत्यांना म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला पुन्हा गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार या चर्चेंना पूर्ण विराम मिळेल.    

आता शशी थरूर यांचा काँग्रेसला घरचा अहेर!

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी शरुर यांच्यासह काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींच्या नावाचे समर्थन केले होते. २० ऑगस्टला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मतिथी कार्यक्रमाच्या तयारीसाठी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी झारखंड काँग्रेसचे प्रभारी आरपीएन सिंह यांनी प्रियांका गांधींनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना केली. काँग्रेसच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांनी यावर साफ नकार कळवला. अध्यक्षपदाच्या शर्यतीतीन नाव नको, असे प्रियांकांनी उपस्थित नेत्यांना सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress general secretary priyanka gandhi sharp message on cong president job says do not take my name