पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सचिन, सौरव, लक्ष्मण या त्रिकुटाला विनाकारण लक्ष्य केलंय'

सौरव,लक्ष्मण आणि सचिन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल अधिकारी डी के जैन यांनी हितसंबंधांसंदर्भात नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर ही कार्यवाही करण्यात आली असून जैन यांनी पाठवलेल्या नोटिसमध्ये ‘बीसीसीआय’च्या नियमावलीतील कलम ३९ अन्वयेही तक्रार दाखल करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. 

‘बीसीसीआय’च्या सल्लागार समितीवर कार्यरत असताना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ही मंडळी मार्गदर्शक म्हणून कार्यरत कशी आहे, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात दोन्ही दिग्गजांना २८ एप्रिलपर्यंत लिखित उत्तर देणे बंधनकारक आहे. याप्रकरणी बीसीसीआला आपली भूमिका मांडता यावी यासाठी त्यांनाही  एक प्रत पाठवली आहे. 

या निर्णयावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये असे म्हटले आहे की,  सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्यावर विनाकारण निशाणा साधण्यात येत आहे. या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नव्या संहितेसंदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. हितसंबंधांसंदर्भातील नियमामध्ये गोंधळ असल्याचे स्पष्ट दिसत असून या नियमामुळे सचिन आणि लक्ष्मण सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन मिळवण्यापासून युवा खेळाडू वंचित राहू शकतात, 

ते पुढे म्हणाले की, या नियमावली गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे सचिनला दंड भरावाच लागेल. कारण बीसीसीआयच्या सल्लागार समितीने (सीएसी) त्याच्या सेवेचा अधिक लाभ घेतलेला नाही. सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना अशा प्रकारे रोखल्याने भारतीय क्रिकेटचे नुकसान होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यानंतर या दोन खेळाडूंना या प्रकरणाला सामोरे जावे लागत आहे.