कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून ते १ ४ एप्रिलपर्यंत २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना विषाणूच्य संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांची घरात कोंडी झाली आहे.
आफ्रिदीला सपोर्ट दिल्याने युवी-भज्जी झाले ट्रोल
संयम आणि संकल्प निश्चितीच्या खेळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणाऱ्या खेळाडूंवरही बंधने आली आहेत. भारताची धावपटू हिमा दास लॉकडाऊनच्या परिस्थितीत पटियाला येथील राष्ट्रीय अकादमीच्या हॉस्टेलमध्ये अडकून आहे. अकादमीमध्ये बाहेरील कोणालाही येण्याची परवानगी नाही. या परिस्थितीत अकादमीमध्ये आउट डोअर सरावाची परवानगी मिळावी, अशी मागणी हिमा दासने केली आहे. यांसदर्भात तिने केंद्रीय क्रीडा मंत्रायलायाला पत्र लिहिले आहे. तिच्या या मागणीवर क्रीडा मंत्रालय कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोरोना: क्रिकेटपटूंच्या पगारातही कपात होण्याची शक्यता
राष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमा दास हिच्या सह अन्य काही खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयाकडे दिवसातून एक ते दोन तास वेगवेगळ्या टप्प्यात सरावाची परवानगी मागितली आहे. पुढील दोन दिवसात क्रीडा मंत्रालया आपली भूमिका स्पष्ट करेल, असा विश्वासही राधाकृष्णन यांनी व्यक्त केलाय. खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलंय की, जर आम्हाला सरावाला परवानगी मिळणार नसेल तर आम्हाल घरी जाण्याची परवानगी द्यावी. सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे राष्ट्रीय अकादमीतून बाहेर पडण्याची परवानगी मिळणे अशक्यच आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही. सरावासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार की काही काळ विश्रांतीचा सल्ला मिळणार हे सर्व मंत्रालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल.