पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

द्रविड लाभार्थी नाही, CoA समितीकडून स्पष्टीकरण

राहुल द्रविड

 सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या बीसीसाआयच्या प्रशासकीय समितीने  नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविडबाबत कोणताही लाभाच्या पदाचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, याप्रकरणाचा अंतिम निर्णय बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन घेणार आहेत. याबाबतची माहिती प्रशासकीय समितीचे नवनियुक्त सदस्य लेफ्टनंट जनरल रवी थोगडे यांनी दिली आहे. 

INDvWI 3rd ODI: पाऊस दमदार बॅटिंग करण्याची शक्यता

बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन यांनी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला लाभाच्या पदाबाबत नोटीस बजावली होती.  यानंतर याबाबत बऱ्याच माजी खेळाडूंनी टीका केली. यानंतर रवी थोगडे यांनी 'द्रविडकडे कोणतेही लाभाचे पद नसल्याचे स्पष्ट केले. राहुल द्रविडला नोटीस देण्यात आली असली तरी तरी त्याच्या नियुक्तीबाबत काही वाद नाही. नैतिक अधिकाऱ्यांना त्यात कोणते लाभ दिसत असतील तर आम्ही त्यासंदर्भात आमची बाजू मांडू असेही ते म्हणाले आहेत.