पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिग्गज लाराचे दोन विक्रम मागे टाकत गेल पोहचला अव्वलस्थानी

ख्रिस गेल

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराचा सर्वाधिक एकदिवसीय सामन्याचा विक्रम मोडीत काढणाऱ्या गेलने फलंदाजीला उतरल्यानंतर लाराचा आणखी एक विक्रम मागे टाकला. भारताने दिलेल्या २८० धावांचे आव्हान परतवण्याच्या इराद्याने संयमी खेळी करत ७ धावा पूर्ण करताच गेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. 

अल्प विश्रांतीनंतर विराटच्या भात्यातून अखेर शतक निघाले

यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडीजकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ब्रायन लाराच्या नावे होता. लाराने २९९ सामन्यातील २८९ डावात १० हजार ३४८ धावा केल्या आहेत. गेलने भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात लाराचा विंडीजकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्यासोबतच या प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. डावातील ९ व्या षटकात खलील अहमदच्या षटकात १ धाव घेत गेलने लाराला मागे टाकले. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत अवघ्या चार धावांची भर घालत गेल तंबूत परतला. भुवनेश्वर कुमारने गेलला पायचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

WI vs IND 2nd ODI : सामन्याचे सर्व अपडेट्स 

लारानंतर विडींजकडून १० हजार धावांचा टप्पा पार करणारा गेल दुसरा फलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यात विंडीजकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत गेल (१० हजार ३५३ धावा) आता अव्वलस्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ लारा (१० हजार ३४८ धावा), चंद्रपॉल (८ हजार ७७८) तिसऱ्या स्थानाव आहे.