पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Most Sixes Record In WC : षटकारांच्या आतषबाजीच्या विक्रमावर एक नजर

विश्वचषकातील षटकारांचा विक्रम

इंग्लंड आणि वेल्सच्या मैदानात ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी संघ सराव सामन्याच्या माध्यमातून खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत. आतापर्यंतच्या ११ हंगामातील विश्वचषकात अनेक विक्रमाची नोंद झाली आहे. यात तीनवेळा ४०० हून अधिक धावासंख्या उभारणे आणि दोन फलंदाजांनी विश्वचषकात द्विशतक झळकावण्याचा आहे. धावांची बरसात झालेल्या सामन्यात षटकारांची आतषबाजी ही प्रेक्षाकांनी अनुभवली आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर जाणून असे पाच फलंदाज ज्यांनी डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. 

ख्रिस गेल:  
Image result for gayle ht
२०१५ च्या विश्वचषकातील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने १४७ चेंडूत २१५ धावांची खेळी केली होती. ख्रिस गेलने झिम्बाब्वे विरुद्ध केलेली द्विशतकीय खेळी ही विश्वचषकातील पहिले द्विशतक ठरले. आपल्या या खेळीत त्याने १६ षटकार खेचले होते. विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम हा गेलच्या नावे आहे. 
 

मार्टिन गप्टिल-   

Image result for martin guptill ht

२०१५ च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना न्यूझीलँडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गप्टिलने चांगालीच फटेबाजी केली होती. सलामीला मैदानात आलेल्या मार्टिन गप्टिलने या सामन्यात १६२ चेंडूत नाबाद २३७ धावांची खेळी केली होती. आपल्या द्विशतकीय खेळीत गप्टिलने ११ उत्तुंग षटकार खेचले होते. न्यूझीलँडने हा सामना १४३ धावांनी खिशात घातला होता.  
 
डेव्हिड मिलर- 
Image result for david miller ht
२०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवण्यात आला होता.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने ९२ चेंडूत १३८ धावांची तुफान खेळी केली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिलरने या आपल्या खेळीत ९ षटकार खेचले होते. त्याच्यासह ड्युप्लेसीसच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना ६२ धावांनी जिंकला होता. 

अ‍ॅडम गिलख्रिस्ट 
Image result for adam gilchrist ht
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने २००७ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात १०४ चेंडूत १४९ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना बर्बाजोजच्या ब्रिजटाउनच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात गिलख्रिस्टने ८ उत्तुंग षटकार लगावले होते. त्याच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ५४ धावांनी पराभूत करत सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. 

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) 

Image result for gayle ht
२०१५ च्या विश्वचषकातील न्यूझीलँड विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली होती. वेलिंग्टनच्या मैदानावर  न्यूझीलँडने दिलेल्या ३९४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर गेलने ३३ चेंडूत ६१ धावांची आक्रमक खेळी केली होती. यात त्याने ८ षटकार लगावले होते. वेस्ट इंडिजने हा सामना १४३ धावांनी गमावला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chris Gayle David Miller Martin Guptill Adam Gilchrist Set most sixes in an innings world cup history Record