पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट ब्रिगेडच्या 'या' प्लॅनमुळे कुलदीप-चहल संघाबाहेर

कुलदीप-चहलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघात स्थान मिळालेले नाही

भारतीय संघातील हुकमी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना टी-२० सामन्यापासून दूर ठेवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. राहुल चाहर आणि वाशिंग्टन सुंदर यांना संधी देऊन भारतीय संघ टी-२० मध्ये २०० धावांटचा टप्पा पार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरत असल्याचे कोहलीने म्हटले आहे.

BCCI ने दिनेश कार्तिकला माफ केलं!

कोहलीच्या या रणनितीवर अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी असहमती दर्शवली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी या दोन दिग्गज फिरकीपटूंकडे दुर्लक्षित करणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कुलदीप यादव आणि युजवेंद्र यांना टी-२० सामन्यात वर्णी लागली नाही. यावर भारताचे माजी सलामीवीर आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा म्हणतात की, फलंदाजीचा स्तर चांगला असेल तर आपण निश्चितच मोठी धावसंख्या उभारत असतो. मात्र या पद्धतीने तुम्ही पारंपारिक पद्धतीने क्रिकेट खेळू शकत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका

या संदर्भात त्यांनी इंग्लंडच्या संघाचा दाखला दिला आहे. इंग्लंडने ४०० धावांचे लक्ष्य ठेवून फलंदाजीवर अधिक भर दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी हे सिद्धही करुन दाखवले. टी-२० मध्ये भारत हाच फॉर्म्युला वापरत असल्याची शक्यता आकाश चोप्रा यांनी व्यक्त केली. या रणनितीने भारताकडून टी-२० मध्ये २२० धावा करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

भारताच्या या रणनितीमुळे फिरकीपटूंच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, अशी शंका भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही तरी या गोलंदाजांनी स्थानिक क्रिकेटवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी कुलदीप आणि चहल यांना दिला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chennai Super Kings Owner N Srinivasan Confirms Mahendra Singh Dhoni Will be Captain of CSK in Indian Premier League 2020